जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:23+5:302021-05-05T04:32:23+5:30
ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा ...

जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी
ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग
लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाले असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. महावितरणकडे पाठपुरावा करूनही वेळेवर ट्रान्सफाॅर्मर दुरुस्त करून मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. याकडे महावितरण प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एसटीच्या मालवाहतूक उपक्रमाला प्रतिसाद
लातूर : उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मालवाहतूक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या अकरा महिन्यांच्या काळात लातूर मंडळाला १ कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या २२ मालवाहतूक ट्रक सेवेत असून किराणा माल, शेतीविषयक खते, बियाणांची वाहतूक केली जात आहे. लातूर मंडळात औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि लातूर या पाच आगारांचा समावेश आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाने सांगितले.
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा
लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अहमदपूर, लातूर, रेणापूर, उदगीर, जळकोट आदी तालुक्यांतील गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत. तहसील कार्यालयातून पडताळणी केल्यानंतर या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना राबिवल्या जात आहेत.
ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम
लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुले, युवक तसेच गावातील ज्येष्ठांनी मिळून काही ठिकाणी अँटी कोरोना फोर्स कार्यान्वित केली आहे. दवंडीद्वारे विनाकारण बाहेर फिरू नये, अशा सूचना केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी मोहीमही राबविली जात आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला लक्षणे दिसताच आरोग्य तपासणी करावी. तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी शेतशिवारात स्थलांतर केले असल्याचे चित्र आहे.