जळकोट न्यायालयासाठी जागेची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:51+5:302021-03-19T04:18:51+5:30
शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खुल्या इमारतीत न्यायालय सुरू करण्यासाठी पाहणी करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या ग्राम न्यायालयाची जागा, जुने ...

जळकोट न्यायालयासाठी जागेची केली पाहणी
शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खुल्या इमारतीत न्यायालय सुरू करण्यासाठी पाहणी करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या ग्राम न्यायालयाची जागा, जुने तहसील कार्यालय, बाजार समितीची इमारत, सोसायटीचे सभागृह, पंचायत समितीचे गोदाम अशा ठिकाणच्या जागेची पाहणी बुधवारी करण्यात आली. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष बालाजी पाटील, ॲड. भगवान पाटील तिरुकेकर, ॲड. तात्या पाटील, ॲड. कुमठेकर, ॲड. श्याम सुंदरगवळे, ॲड. दिक्षीत, ॲड. टोम्पे, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रेमकुमार कोरे, पंकज शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, नगरसेवक महेश शेटे, दस्तगीर शेख, धनंजय भ्रमण्णा, चेअरमन अशोक डांगे, डॉ. चंद्रकांत काळे, आयुब शेख, दाऊद बिरादार, तलाठी युवराज खरे आदी उपस्थित होते.