जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST2021-03-18T04:19:04+5:302021-03-18T04:19:04+5:30
यावेेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, मधुकर धुळशेट्टे, दगडोजीराव ...

जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
यावेेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, मधुकर धुळशेट्टे, दगडोजीराव पाटील, माजी उपसभापती गोविंदराव माने यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, डॉ. कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. खंडागळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील, विठ्ठल चव्हाण, गजानन दळवे, धनंजय भ्रमण्णा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे माजी संचालक बाबुराव जाधव, गोविंद भ्रमण्णा, अशोक डांगे, दस्तगीर शेख, श्याम डांगे, गोपाळकृष्ण गबाळे, सत्यवान पाटील, काँग्रेसचे गटनेते महेश शेटे, संग्राम नामवाड, माजी प्राचार्य संपत शिंगाडे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोरगरिबांची परवड होऊ नये, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शासन नियमांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.