अतिवृष्टीमुळे शेत-शिवारात जाऊन नुकसानीची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:39+5:302021-09-12T04:24:39+5:30
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे ...

अतिवृष्टीमुळे शेत-शिवारात जाऊन नुकसानीची केली पाहणी
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, माजी सभापती मन्मथप्पा किडे, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, माजी जि.प. सदस्य रामराव राठोड, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, अंबादास गणूचे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे, सत्यवान पांडे, बालासाहेब दळवे, सरपंच सत्यवान चव्हाण, विकास सोमुसे, सरपंच महेताब बेग, दाऊद बिरादार, सुरेश चव्हाण, अशोक डांगे, गोविंद भ्रमण्णा, नगरसेवक महेश धुळशेट्टे, ॲड. तात्या पाटील, गोविंद माने, दत्ता पवार, दिलीप कांबळे, बालाजी आगलावे, विश्वनाथ इंद्राळे, संग्राम नामवाड, महेश स्वामी, ॲड. पद्माकर उगिले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, प्रा. श्याम डावळे, कार्यकारी अभियंता दराडे, पोनि परमेश्वर कदम उपस्थित होते.
नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे...
कृषी सहायकांमार्फत पीक विमा कंपनीकडे ऑफलाईन अर्ज करावेत. रस्ते, पुलाच्या नुकसानाची तात्काळ सर्वे करावा. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करावेत. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा. पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू कराव्यात, अशा सूचना करुन राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, नुकसानग्रस्तांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
राज्यमंत्री बनसोडे यांनी घोणसी, गुत्ती, धोंडवाडी, शिवाजीनगर तांडा, रामपूर तांडा, मेवापूर, चिंचोली, अतनूर, गव्हाण, सुल्लाळी, डोंगरगाव, रावणकोळा, हळद वाढवणा येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले.