लातूर जिल्ह्यात कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 21:25 IST2017-04-13T21:25:27+5:302017-04-13T21:25:27+5:30
कर्जामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका अल्पभूधारक शेतक-याने गावाजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

लातूर जिल्ह्यात कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
हेर (जि. लातूर), दि. 13 - कर्जामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका अल्पभूधारक शेतक-याने गावाजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वा़ च्या सुमारास जयाबाईचीवाडी (ता़ उदगीर) येथे घडली.
अशोक वामन मुंढे (४५, रा़ जयाबाईची वाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे़ अशोक मुंढे यांना तीन एकर शेती आहे़ त्यांच्या लहान मुलीचा विवाह फेब्रुवारी महिन्यात झाला होता़ त्यांच्यावर पूर्वीचे कर्ज होते़ मुलीच्या विवाहासाठी आणखीन त्यांनी कर्ज काढले होते़ कर्ज कसे फेडायचे आणि संसार कसा चालवायचा या विवंचनेत होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
या चिंतेतूनच अशोक मुंढे यांनी गुरुवारी दुपारी गावाजवळील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.