शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपाचा स्तुत्य उपक्रम; रुग्णालयात पोहोचण्यासाठी गरोदर मातांच्या सेवेत जननी रथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 15:36 IST

शहरात १४० आशा वर्कर्सनी केल्या मातांच्या नोंदी

लातूर: गरोदर मातांची प्रसूती सुरक्षित व्हावी, यासाठी लातूर मनपाने रुग्णालयात जाण्यासाठी जननी रथ तयार केला आहे. रुग्णालयात जाणे आणि सुटी झाल्यानंतर घरी पोहोचविण्यासाठी जननी रथ सेवेत राहणार आहे. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार १४० आशा वर्कर्सनी शहरातील गरोदर मातांच्या नोंदी केल्या असून, तारखेनिहाय अपेक्षित प्रसूतीचीही नोंद आशा वर्कर्सनी ठेवली आहे.

लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तसेच लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी गरोदर माता दाखल होतात. या रुग्णालयात जाण्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये, वेळेत रुग्णालयात पोहोचता यावे, यासाठी मनपाने खास सोय केली आहे. विशेष उपक्रमांतर्गत जननी रथ तयार केला आहे. २४ तास जननी रथ सेवा देणार आहे. ६ जानेवारीपासून ही सुविधा सुरू झालेली आहे. रुग्णालयात पोहोचविणे आणि सुटी झाल्यानंतर घरी आणण्याची जबाबदारी जननी रथाची असेल.

तारखेनिहाय अपेक्षित प्रसूतीलातूर मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आशा वर्कर्सनी गरोदर मातांच्या नोंदी केल्या आहेत. त्या मातांची प्रसूती कोणत्या तारखेत होऊ शकते, या संदर्भाची नोंदही आशा वर्कर्सनी घेतली आहे. या नोंदीनुसार आशा वर्कर्स मातांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दवाखाना आणि स्त्री रुग्णालयात दाखल करण्यासाठी अशा वर्कर्ससह जननी रथ सेवेत राहील.

व्हॉटस्ॲप ग्रुपवरून डिस्चार्जची माहितीमनपाच्या आरोग्य विभागाने वुमन्स रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या मातांना सेवा देण्यासाठी या दोन्ही रुग्णालयांसोबत व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला आहे. शहरातील ज्या माता बाळंतपणासाठी या रुग्णालयात दाखल आहेत, त्यांना कधी सुटी मिळणार आहे, या संदर्भातची माहिती घेण्यासाठीही रुग्णालयासोबत व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला आहे. जेणेकरून गरोदर मातांना सुटी झाल्यानंतर घरी पोहोचविण्यासाठी जननी रथाची सुविधा मिळेल.

परिचारिका, स्वयंसेविकांचा संपर्कप्राथमिक नागरी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा स्वयंसेविका यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करणे व डिस्चार्ज झाल्यानंतर घरी नेऊन सोडणे, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिचारिका, स्वयंसेविका मातांच्या संपर्कात राहतील, तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या योजनेचा लाभ मातांनी घ्यावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

दोन दिवसांत दोन मातांना दिली सुविधा६ जानेवारीपासून जननी रथ सेवेत दाखल झाला आहे. या जननी रथाची सेवा गेल्या दोन दिवसांमध्ये दोन मातांना दिली आहे. स्त्री रुग्णालयात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी मातांना सोडण्यात आले, असे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य