समाज माध्यमात हिंदी भाषेचा प्रभाव वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST2021-09-16T04:25:44+5:302021-09-16T04:25:44+5:30

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिरक महोत्सवी वर्षानिमित्त हिंदी दिन व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी होते. ...

The influence of Hindi language is increasing in social media | समाज माध्यमात हिंदी भाषेचा प्रभाव वाढतोय

समाज माध्यमात हिंदी भाषेचा प्रभाव वाढतोय

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिरक महोत्सवी वर्षानिमित्त हिंदी दिन व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी होते. डॉ. जोशी म्हणाल्या, हिंदी भाषा समृद्ध आणि वैज्ञानिक आहे. जागतिकीकरणात भारताच्या वाढत्या प्रभावामुळे जगात हिंदीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. समाज माध्यमाने सर्वात प्रभावी अभिव्यक्ती होत असल्यामुळे साहित्य निर्मितीत हिंदीचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ही बाब हिंदी भाषेसाठी अधिक महत्त्वाची आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. तांबोळी म्हणाले, भारताच्या अस्मितेची भाषा हिंदी असून या भाषेने जगात देशाची ओळख निर्माण केली आहे. हिंदी राष्ट्रभाषा असून तिचा योग्य वापर केला तर रोजगार उपलब्धीही होऊ शकते, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. प्रवीण जाहूरे यांनी केले. सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी.एस. भुक्तरे यांनी तर आभार प्रा. डॉ. पुष्पलता काळे यांनी मानले.

Web Title: The influence of Hindi language is increasing in social media