शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

By हरी मोकाशे | Updated: April 4, 2024 17:44 IST

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही.

लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं.से. च्या वर गेेला आहे. परिणामी, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असल्याने पाणीटंचाई चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर नद्याही वाहिल्या नाहीत. परिणामी, जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून उपलब्ध जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावांत टंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ३९० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३७औसा - ४६निलंगा - ५८रेणापूर - २७अहमदपूर - ७०चाकूर - १७शिरूर अनं. - ०५उदगीर - २०देवणी - १जळकोट - ८एकूण - २८९

११९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणी...जिल्ह्यातील २८९ गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ३९० प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. त्याची पाहणी केली असता त्यातील २७ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी २०१ गावांचे २४५ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ११९ गावांना १३२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

दोन तालुक्यांत अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील प्रत्येकी पाच व एका गावाने अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले असले तरी अद्यापही मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन तालुक्यात एकही अधिग्रहण करण्यात आले नाही.

सात गावांना ८ टँकरने पाणी...जिल्ह्यातील १७ गावे आणि एका वाडीस तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यापैकी ७ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यात औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, मोगरगा, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे.

१० गावांना टँकरची प्रतीक्षा...अहमदपूर तालुक्यातील फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी, निलंगा तालुक्यातील लिंबाळा या गावांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीdroughtदुष्काळ