पशुधनासाठी साथरोग प्रतिबंधक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:52+5:302021-06-18T04:14:52+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३५ हजारापेक्षा अधिक पशुधन आहे. त्यात २५ हजार दुधाळ जनावरे आहेत. बहुतांश शेतकरी, शेतमजूर पूरक ...

पशुधनासाठी साथरोग प्रतिबंधक लसीकरण
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३५ हजारापेक्षा अधिक पशुधन आहे. त्यात २५ हजार दुधाळ जनावरे आहेत. बहुतांश शेतकरी, शेतमजूर पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. पावसाळ्यात पशुधनास कोणत्याही प्रकारच्या साथीचे आजार होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने साथरोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील कानेगाव येथून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. ही मोहीम तालुकाभर राबविली जाणार आहे. पशुपालकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती गोविंद चिलकुरे यांनी केले.
साथरोगासाठी लसीकरण आवश्यक...
पावसाळ्यात पशुधनास घटसर्प, एकटांग्या, लाळ्या, खरकुत, फऱ्या, तोंडखुरी, पायखुरी आदी साथीचे आजार होऊ शकतात. त्यावर वेळीच उपचार न केल्यास पशुधन दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी वेळीच पशुधनाचे लसीकरण करावे, असे आवाहन सभापती चिलकुरे यांनी केले आहे.