डिगोळ येथून देशी गाईचे गोरं चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:56+5:302021-02-05T06:25:56+5:30
सावेवाडी येथून दुचाकीची चोरी लातूर : लातूर शहरातील सावेवाडी येथे पार्किंग केलेल्या एमएच २४ झेड ०६०३ या क्रमांकाची दुचाकी ...

डिगोळ येथून देशी गाईचे गोरं चोरीला
सावेवाडी येथून दुचाकीची चोरी
लातूर : लातूर शहरातील सावेवाडी येथे पार्किंग केलेल्या एमएच २४ झेड ०६०३ या क्रमांकाची दुचाकी चोरल्याची घटना २७ रोजी घडली. याबाबत संतोष विरेंद्र मलवाडे (रा. मुशिराबाद जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. भताने करीत आहेत.
उदगीरच्या रामनगरातून दुचाकी चोरीला
लातूर : उदगीर येथील रामनगर येथे पार्किंग केलेल्या एमएच २४ टी ९९०४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत पांडुरंग माणिकराव पाटील (रा. लाळी खु. ता. जळकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : जुन्या भांडणाची कुरापत काढून संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करून लोखंडी पाईपने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना निलंगा तालुक्यातील भुतमुंगळी येथे घडली. याबाबत शिवशंकर गुणवंत रामतीर्थे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरिश्चंद्र विलास रामतीर्थे व अन्य तिघांविरुद्ध कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना. जाधव करीत आहेत.