निलंगा यूथचे बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST2021-01-24T04:09:34+5:302021-01-24T04:09:34+5:30
पालिकेच्या अनेक दुकानांचे फेरलिलाव झाले नाहीत; अथवा ज्यांच्या नावावर दुकाने आहेत, त्यांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्यावर कारवाई करून दुकानांचे ...

निलंगा यूथचे बेमुदत धरणे आंदोलन
पालिकेच्या अनेक दुकानांचे फेरलिलाव झाले नाहीत; अथवा ज्यांच्या नावावर दुकाने आहेत, त्यांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्यावर कारवाई करून दुकानांचे फेरलिलाव करण्यात यावेत, नीळकंठेश्वर मार्केट यार्डमधील लाकडी मशीन मालकांनी अतिक्रमण करून बंद केलेला रस्ता खुला करण्यात यावा, तसेच अतिक्रमण केल्याने त्यांना दंड आकारावा. पालिकेच्या दुकानांना कमाल व किमान भाडे निश्चित करण्यात यावे, अशा मागण्यांसाठी निलंगा यूथच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनात मुजीब सौदागर, सब्दर कादरी, महेश ढगे, जाकीर शेख, महेमूद शेख, रामेश्वर शानिमे, इस्माईल खुरेशी, मेघराज जेवळीकर, अमोल सोनकांबळे, सय्यद अबूबकर, साहेबराव कांबळे, दशरथ कांबळे, शाहिद अन्सारी, परवेज बुदले, अमीर सय्यद, जमीर शेख, मुशर्रफ तिलगुरे, अजगर औटी, फैमान कादरी, राज मंजुळे, धीरज गायकवाड, लखन पाटील, अजगर अनसारी, गोविंद शिंगाडे, अमोल सोनकांबळे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष धमानंद काळे यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, एमआयएमच्या वतीने तालुकाध्यक्ष शारुख सय्यद, अण्णासाहेब मिरगाळे, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोहोळकर, प्रशांत वांजरवाडे, शुभम डांगे, गोपाळ हिबारे आदी उपस्थित होते.