शेत, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:24+5:302021-03-10T04:20:24+5:30
लातूर : अहमदपूर तालुक्यातील सताळा ते सताळवाडी, सताळा ते साळुंकवाडीमार्गे किनगाव हे दोन रस्ते व सताळा शिवारातील गाडी, शिवरस्ते, ...

शेत, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बेमुदत उपोषण
लातूर : अहमदपूर तालुक्यातील सताळा ते सताळवाडी, सताळा ते साळुंकवाडीमार्गे किनगाव हे दोन रस्ते व सताळा शिवारातील गाडी, शिवरस्ते, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारे रस्ते मोजणी करून अतिक्रमणमुक्त करावेत, या मागणीसाठी सरपंचासह शेतकऱ्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सताळा शिवारातील शेतरस्ते, शिव रस्ते व नकाशावरील रस्ते अतिक्रमणात अडकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यासाठी व ये- जा करण्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. हे रस्ते खुले करावेत, या मागणीसाठी महिला दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी ही उपोषण सुरू होते.
आंदोलनात सरपंच सुवर्णाताई बैकरे, शेतकरी महादेव बेद्रे, राजासाहेब शेख, नरसिंग मुंडे, सोमनाथ काळे, शिवाजी काळे, संजय सोमवंशी, राहुल महाळंकर, अशोक कांबळे, पप्पू महाळंकर, संदीप बैकरे, अविनाश काळे, भागवत सोमवंशी, दत्ता शिंदे, देविदास चंदे, कुशावर्ता चंदे, ग्रामपंचायत सदस्य शालिनीताई काळे आदी सहभागी आहेत.