कचरा पडल्याने वाढली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:31+5:302021-07-11T04:15:31+5:30

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून ...

Increased stench from litter | कचरा पडल्याने वाढली दुर्गंधी

कचरा पडल्याने वाढली दुर्गंधी

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे.

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.

Web Title: Increased stench from litter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.