कोरोना नियमांचे अनुपालन होत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:29+5:302021-03-31T04:19:29+5:30
गेल्या आठ दिवसांमध्ये २७ हजार ७२७ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३ हजार ७६४ बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या ...

कोरोना नियमांचे अनुपालन होत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ
गेल्या आठ दिवसांमध्ये २७ हजार ७२७ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३ हजार ७६४ बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटली होती. महिन्याला केवळ १२०० च्या आसपास रुग्ण आढळत होते. आता मात्र दिवसाला साडेचारशे ते पाचशेच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात कठोर निर्बंध असताना ही संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्ण व नातेवाइकांकडून अनुपालन होत नाही. त्यामुळेही रुग्णांत वाढ होत आहे. जिल्ह्याअंतर्गत कडक निर्बंध असले तरी आंतरजिल्हा वाहतूक सुरू आहे. त्याचाही परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत पाॅझिटिव्हिटी रेट ३.५ टक्के होता. आता गेल्या दहा दिवसांपासून २३.५ टक्के आहे. जो की, प्रशासनाच्या नियंत्रण कक्षेच्या बाहेर आहे. सर्वाधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण सध्या कमी दिसत असली तरी ही बाब चिंताजनक आहे.