जळकोट तालुक्यात काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:37+5:302021-03-21T04:18:37+5:30
जळकोट तालुक्यात आत्तापर्यंत ४९३ जणांना काेराेनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ४५३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर पंधरा जणांचा ...

जळकोट तालुक्यात काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ
जळकोट तालुक्यात आत्तापर्यंत ४९३ जणांना काेराेनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ४५३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. सध्याला जळकाेटसह तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे. याबाबत सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. १९ मार्च रोजी ८ रुग्ण आढळून आले. एखाद्या रुग्णाला सर्दी, ताप, खोकला असल्यास त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, आपल्या शेजारी, गावात असे रुग्ण आढळून आल्यास त्यांनाही रुग्णालयात पाठवावे. या ठिकाणी मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यांची तपासणी करण्यात येईल, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
एकाच दिवशी ८ रुग्ण...
एकाच दिवशी जळकाेट तालुक्यात ८ रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी, यंत्रणा सतर्क झाली आहे. आता आराेग्य यंत्रणेकडून याबाबत उपाययाेजना राबविल्या जात आहेत. नागरिकांनी नाका-तोंडाला हात लावू नये, गर्दी आणि धार्मिक स्थळी जाणे टाळावे, आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आरोग्य विभागाने कळविले आहे. १९ मार्च रोजी आढळलेल्या कोराेना बाधितांना पुढील उपचारासाठी उदगीर येथील सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबतीत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ महाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परदेशी, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.