शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी

By हरी मोकाशे | Updated: June 12, 2024 18:11 IST

कोरड्या घरणी प्रकल्पात आले अडीच टक्के पाणी

लातूर : मृगाच्या प्रारंभापासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये ७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: जोत्याखाली गेलेल्या घरणी मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाल्याने २.५७ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण राहिला. तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होत होती. परिणामी, जलस्त्रोत कोरडे पडत होते तर जलसाठे आटू लागले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या अखेरीस भूजल पातळी २.६७ मीटरने खालावली होती. पावसाळा कधी सुरु होतो, याकडे लक्ष लागून होते.

प्रकल्प - उपयुक्त पाणीसाठा (टक्के)तावरजा - ००रेणापूर - २१.१७व्हटी - ००तिरु - ००देवर्जन - २.८९साकोळ - ३.११घरणी - २.५७मसलगा - ४५.५०एकूण - ९.६३

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा...मृगास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून सतत कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे तहानलेल्या प्रकल्पांना लाभ होत आहे. पाच दिवसांमध्ये रेणापूर मध्यम प्रकल्पात १९.५१ टक्के, घरणी प्रकल्पात २.५७ टक्के तर मसलगा प्रकल्पात ३४.४४ टक्के जलसाठा वाढला आहे. सर्वाधिक पाणीसाठा निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात झाला आहे.

१० दलघमीने वाढले पाणी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. शुक्रवारी एकूण १५.४९० दलघमी पाणीसाठा होता. आता २५.३१६ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत ९.८२६ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला असून आशा पल्लवित झाल्या आहेत.

पाण्याचा प्रश्न कमी होणार...तीव्र उन्हामुळे यंदा ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय, ३८९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. पाऊस होत असल्याने मध्यम प्रकल्पात पाणी वाढत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न कमी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस