कोरोना चाचण्या, लसीकरणाचे प्रमाण वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:47+5:302021-04-02T04:19:47+5:30
येथील तहसील कार्यालयात आयोजित गृहविलगीकरणातील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, ग्रामीण ...

कोरोना चाचण्या, लसीकरणाचे प्रमाण वाढवा
येथील तहसील कार्यालयात आयोजित गृहविलगीकरणातील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. ओमप्रकाश कदम, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे, तलाठी युवराज करेप्पा आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. गृहविलगीकरणातील रुग्ण घरीच राहतात की बाहेर पडतात, यावर लक्ष केंद्रित करावे. जर कोणी घराबाहेर फिरत असतील, तर विशेष पथकामार्फत लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी ढोरसांगवी येथे सुरू असलेल्या पालकमंत्री पाणंदमुक्ती रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सदरील कामे तत्काळ व दर्जेदार करावी, अशा सूचना केल्या.
कोविड केअर सेंटरमधील जाणून घेतल्या अडचणी...
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जळकोट येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. काही सूचनाही केल्या. त्यानंतर, त्यांनी जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेतल्या. आतापर्यंत किती जणांनी लसीकरण करून घेतले आहे, याची माहिती घेतली. तेव्हा डॉ. जगदीश सूर्यवंशी यांनी तालुक्यात आतापर्यंत तीन हजार ८५५ जणांनी लस घेतल्याचे सांगितले. तसेच शहरातील पाणीटंचाईचा आढावा घेऊन तत्काळ पाणीपुरवठ्याबाबत संबंधित विभागाला सूचना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.