किनगाव : विजेच्या धक्क्याने म्हैस दगावल्याची घटना रेणापूर तालुक्यातील व्हटी क्रमांक १ शिवारात मंगळवारी घडली. याबाबत किनगाव पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी ज्ञानेश्वर रामकिशन केदार (रा. व्हटी, ता. रेणापूर) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते सायगाव शिवारात दिवसभर आपली म्हैस चारुन संध्याकाळी घरी निघाले हाेते. शिवारातील विद्युत डीपीवरुन विद्युत पुरवठ्याची सर्व्हिस वायर देण्यात आली आहे. ही वायर जमिनीवर पडली हाेती. या वायरचा स्पर्श झाल्याने म्हशीला विजेचा धक्का बसला व म्हैस जाग्यावरच दगावली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सायगाव शिवारात घडली. म्हैस दगावल्याने या शेतकऱ्याचे जवळपास ९० हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबत किनगाव पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन नाेंद करण्यात आली आहे.