कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:15+5:302021-03-21T04:19:15+5:30

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, जिल्ह्यातील गत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय प्रशासनाने ...

As the incidence of corona increases, government agencies need to be prepared | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, जिल्ह्यातील गत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय प्रशासनाने मास्कची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची वेळ आली. तरी प्रशासनाने कुचराई करू नये, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले. बैठकीत उदगीर येथील दवाखान्यातील उपलब्ध बेड, त्याचबराेबर ऑक्सिजनची उपलब्धता, याचा आढावा घेण्यात आला. त्याचबराेबर लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यात यावा, असेही निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले आहेत. बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. सतीश हरिदास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार, नोडल अधिकारी डॉ. देशपांडे, डॉ. बालाजी भोसले आदींची उपस्थिती होती.

Web Title: As the incidence of corona increases, government agencies need to be prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.