परिवर्तन लायनेस क्लबचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST2021-02-25T04:24:54+5:302021-02-25T04:24:54+5:30
याप्रसंगी ऑल इंडिया लायनेस क्लबच्या अध्यक्ष डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी नवनिर्वाचित सावित्री लायनेस क्लब लातूर अध्यक्ष शितल वाडीकर, सचिव ...

परिवर्तन लायनेस क्लबचा पदग्रहण सोहळा
याप्रसंगी ऑल इंडिया लायनेस क्लबच्या अध्यक्ष डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी नवनिर्वाचित सावित्री लायनेस क्लब लातूर अध्यक्ष शितल वाडीकर, सचिव सुनिता मुचाटे, कोषाध्यक्ष सोनाली पाटील तसेच परिवर्तन लायनेस क्लब (दत्तकगाव) गांजूरची अध्यक्ष योजना भोसले, सचिव मोहर कुंभार व सोनिया लटपटे,कोषाध्यक्ष कौशल्या मोरे, उपाध्यक्ष- सुनंदा जाधव, पीआरओ संगीता लटपटे, संयोजिका- किश्किंदा घोटकर आदींना पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ऑनलाईन शपथ घेेतली. तसेच प्रत्येक पदाची जबाबदारी आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी लायनेस डिस्ट्रिक्ट प्रांताध्यक्ष सुनंदा गुप्ता, क्षेत्रीय संयोजिका स्मिता मित्तल, लातूर लायनेस अध्यक्ष तथा सरपंच डॉ कुसुम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक लायनेस डिस्ट्रिक्ट क्लबच्या उपप्रांताध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.यावेळी पूर्वप्रांताध्यक्ष बीना चावला,उषा बाहेती, उषा नागपाल, माजी अध्यक्ष प्रा.कौसल्या खोसे- जाधव, लातूर लायनेस सचिव संजयादेवी गोरे-पवार यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमास उपाध्यक्ष-विद्या देशमुख, मिनाक्षी विभूते, श्रद्धा पाठक, डॉ. क्रांती मोरे,डॉ.प्रभावती वाडकर, डॉ. उमा कडगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानिमित्त लातूर लायनेस क्लबने दत्तक घेतलेले गाव गांजूर येथे कोरोना जनजागृतीकरीता पत्रके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा कांदे यांनी केले.