शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

लातुरात ५ दुचाकीसह एक जाळ्यात; पाच गुन्ह्यांचा झाला उलगडा

By राजकुमार जोंधळे | Updated: January 9, 2023 19:37 IST

दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर : चाेरीतील दुचाकी खरेदी-विक्री करण्यासाठी लातुरात आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवीन रेणापूर नाका येथे अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. अधिक चाैकशीत लातूरसह हडपसर - पुणे येथे दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पाेलिसांनी सांगितले, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दुचाकी चाेरी आणि इतर गुन्ह्यांच्या तपासाचे आदेश दिले हाेते. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेत पाेलिस आराेपीच्या मागावर हाेते. चाेरीतील दुचाकी लातुरातील नवीन रेणापूर नाका, रेल्वे स्थानक परिसरात खरेदी-विक्री करण्यासाठी एक जण येत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तेथे सापळा लावला. यावेळी चोरीच्या दुचाकी खरेदी - विक्रीचा व्यवहार करण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात फिरणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेत अधिक चाैकशी केली असता, मुकेश वामन गायकवाड (वय २८, रा. हंचनाळ, ता. निलंगा) असे नाव त्याने सांगितले. पाेलिसांनी हिसका दाखवताच लातूर शहरासह इतर जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. त्या दुचाकी एकत्र लपवून ठेवून एकदाच विक्री केली जाते, असेही सांगितले. त्याच्याकडून पाेलिसांनी पाच दुचाकी (किंमत १ लाख ५० हजार) असा मुद्देमाल जप्त केला आहे.

लातूर - पुणे जिल्ह्यात पाच गुन्हे दाखल...लातूर जिल्ह्यात ४ गुन्हे आणि पुणे जिल्ह्यात १ गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. लातुरातील एमआयडीसी ठाण्यात तीन, गांधी चाैक पाेलिस ठाण्यात १ आणि हडपसर - पुणे ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, राजेश कंचे, जमीर शेख, नितीन कठारे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी