नुकसानीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:18+5:302021-09-09T04:25:18+5:30
जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जळकोट, हळद वाढवणा, रावणकोळा या गावांचा संपर्क तुटला होता तसेच जळकोट येथील तलावाचा सांडवा फोडून ...

नुकसानीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करावेत
जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जळकोट, हळद वाढवणा, रावणकोळा या गावांचा संपर्क तुटला होता तसेच जळकोट येथील तलावाचा सांडवा फोडून दिल्यामुळे अनर्थ टळला. तिरू नदी दुधडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीपात्रानजीकच्या काही शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रावणकोळा, कुणकी, जिरगा या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या उसात पाणी शिरल्याने उसासह अन्य पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करावेत. मंडल अधिकारी, तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करावी. अहवाल तत्काळ सादर करावा, असेही राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले.
तालुक्यातील साठवण व पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले.