‘आयआयएम-एन’ देशातील सर्वोत्कृष्ट संस्था होणार

By Admin | Updated: July 27, 2015 00:58 IST2015-07-27T00:58:59+5:302015-07-27T00:58:59+5:30

आयआयएम-एन’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट-नागपूर) नवीन असले तरी येत्या काळात देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून तिचे नाव

'IIM-N' will be the best institution in the country | ‘आयआयएम-एन’ देशातील सर्वोत्कृष्ट संस्था होणार

‘आयआयएम-एन’ देशातील सर्वोत्कृष्ट संस्था होणार

नागपूर : ‘आयआयएम-एन’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट-नागपूर) नवीन असले तरी येत्या काळात देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून तिचे नाव असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘आयआयएम-एन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या पहिल्या बॅचमध्ये देशातील ५७ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला असून, पहिल्या सत्राची सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘आयआयएम-अहमदाबाद’चे संचालक डॉ. आशिष नंदा, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. विश्राम जामदार प्रामुख्याने उपस्थित होते. भारतातील ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’सारख्या संस्था तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आघाडीवर आहेत आणि हीच आज देशाची गरज आहे. जागतिक पातळीवर मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. घोषणा झाल्यापासून अगदी अल्प कालावधीतच ‘आयआयएम’ला सुरुवातदेखील झाली, ही अभिमानाची बाब आहे. यातून नागपूरचा विकास होईल, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.

Web Title: 'IIM-N' will be the best institution in the country