वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार...पाेलिसांची करडी नजर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:18+5:302021-09-19T04:21:18+5:30
तर गुन्हा दाखल... रस्त्यावर वाहन उभे करून केक कापण्याचे प्रकार वाढले आहेत. तलवारीने केक कापणे, डीजेवर गाणी लावून रस्त्यावरच ...

वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार...पाेलिसांची करडी नजर..!
तर गुन्हा दाखल...
रस्त्यावर वाहन उभे करून केक कापण्याचे प्रकार वाढले आहेत.
तलवारीने केक कापणे, डीजेवर गाणी लावून रस्त्यावरच गाेंधळ घालणे.
मध्यरात्री फटाके फाेडल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
तर रस्त्यावरच वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कारवाई...
रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. लातूर जिल्ह्यातील बहुतांश कारवाया या रस्त्यावर तलवारीने केक कापल्याप्रकरणी करण्यात आल्या आहेत.
रस्त्यावर तलवारीने केक कापून त्यांचे व्हीडिओ, फाेटाे व्हाॅटस्ॲप आणि फेसबुकसह साेशल मीडियावर व्हायरल करण्याच्या घटना गत काही दिवसांपासून शहरात वाढल्या आहेत.
ग्रामीण भागातही रस्त्यावरच वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले आहेत. भर रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी वाहन उभे करून, त्यावर केक ठेवून ताे कापला जाताे. त्यानंतर माेठ्याने गाणी लावून धिंगाणा घातला जात असल्याचे समाेर आले आहे.