शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र पालटेल: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:32 IST

स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची तयारी

लातूर : शिवसेना आणि मनसे एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुखराज ठाकरे हेच निर्णय घेतील. दोन्ही बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र पालटेल, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचेही खैरे म्हणाले.

लातूर शहरात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत खैरे बाेलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी झाल्यास पक्ष प्रमुखांच्या आदेशावरून एकत्र निवडणूक लढवू. राज्यातील महायुती सरकार केवळ आश्वासने देणारे आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र, खात्यावर तेवढी रक्कम जमा केली नाही. महायुतीत तीन गट पडले असून, त्यांच्यातील अंतर्गत वाद विकोपाला जात आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, जयश्रीताई उटगे, सुनीताताई चाळक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे