शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

युती होगी तो ठीक, नहीं तो पटक देंगे; अमित शहा यांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 05:25 IST

लोकसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांचाही स्वबळाचा नारा; ४८ पैकी ४० जागा जिंकण्याचा निर्धार

लातूर : युती होगी तो ठीक, नहीं तो पटक देंगे, अशा स्पष्ट शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला इशारा देत, नव्या संघर्षाला तोंड फोडले आहे. २०१४ मध्ये युती नव्हती, तरीही फडणवीस मुख्यमंत्री झाले, याची आठवणही त्यांनी करून दिली. २०१४ पेक्षा २०१९ चा विजय मोठा असेल. ४८ पैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवावी, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला.

लातुरात रविवारी भाजपाच्या बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, विजयासाठी दोन कोटी मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा अधिक सरकारचे लाभार्थी आहेत. त्यामुळे ४० जागा जिंकण्याच्या तयारीला लागा. भाजपाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कार्यकर्ता आहे. संघटना हीच ताकद आहे. युती होईल की नाही, हे अध्यक्ष ठरवतील. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, भाजपाच्या कामाचा आधार हा संघटन असून, पक्षाचे ११ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. २०१४ मध्ये आपल्याकडे सहा राज्ये होती. आज १६ राज्यांमध्ये भाजपा आहे. २०१९ मध्ये ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपा येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. पंतप्रधान आवासमध्ये प्रत्येकाला घर मिळाले आहे.पानिपतची लढाई आपण जिंकलो असतो, तर इंग्रजांनी भारतात राज्य केले नसते. पानिपतची जशी लढाई होती, तशी २०१९ ची लढाई देशासाठी आहे. गठबंधन कोणाचेही होवो, विजय भाजपाचाच आहे. काँग्रेसच्या काळामध्ये ५५ वर्षांत त्यांनी कोणताही विकास केला नाही. उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाले.तर भाजपा सरकारने पाकिस्तानच्या जमिनीवर जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले, असेही शहा म्हणाले. तसेच यावेळी शहा यांनी गॅस कोणी दिला, शौचालय कोणी दिले हे घरोघरी जाऊन सांगा. आजच्या सारखे १०० मेळावे होणार असल्याचेही सांगितले.

बॅनर गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्राविना...नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद अर्थात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा लातूरला झाला. परंतु, मराठवाड्यातील दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्रा विनाच शहरातील बॅनर आणि होर्डिंग्ज झळकत होते. मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पत्रकारांना बाहेर पाठविले...पक्ष, कार्यकर्त्यांच्या बैठकीस निमंत्रितांनाच प्रवेश होता. त्यामुळे वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना अमित शहा यांच्या स्वागतानंतर सभा स्थळावरून बाहेर पाठविण्यात आले. संपूर्ण बैठक अनेक कार्यकर्ते फेसबुक लाईव्ह करीत होते. मोबाईलवरून माहिती देत होते.फिर एक बार मोदी सरकार२०१४ साली ‘अबकी बार-मोदी सरकार’ हा नारा होता. आता ‘फिर एकबार - मोदी सरकार’ हा नारा आहे. येणारा विजय मोठा असेल. स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा. एकहाती सत्ता मिळवायची असेल, तर दोन कोटी मते लागतील. त्यापेक्षा अधिक लोकांपर्यंत आपण योजना पोहोचविल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घरांपर्यंत गॅस पोहोचविला. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.राफेलमध्ये ५० पैशांचाही घोटाळा नाही - अमित शहाराहुल गांधींवर टीका करताना अमित शहा म्हणाले, तुमचे चरित्र बघा, नंतर दुसºयांवर आरोप करा. राफेलमध्ये ५० पैशांचाही घोटाळा नाही. उलट आई आणि मुलगा दोघेही जामिनावर आहेत. ते खोटे बोलत आहेत. नांदेडवालेही आदर्शमध्ये सुप्रीम कोर्टात येतील.जनमत चाचणीचा निष्कर्ष; भाजपाला २२ जागामहाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपाला २२, शिवसेनेला आठ तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी नऊ जागा मिळू शकतील, असा निष्कर्ष इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या जनमत चाचणीतून काढण्यात आला आहे. - वृत्त/देश-परदेश

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहShiv Senaशिवसेना