शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू; लातुरातील अंबाजाेगाई राेडवरील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: June 12, 2023 22:22 IST

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एका नातेवाइकाकडे मुंजीचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता.

लातूर : शहरातील एका नातेवाइकाकडे काैटुंबिक कार्यक्रमासाठी आजी, मावशी, नातेवाइकांसाेबत आलेल्या एका ११ वर्षीय मुलीचा हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना साेमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री घटनेची नाेंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एका नातेवाइकाकडे मुंजीचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. मुंजीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी, नातेवाइकांनी अंबाजाेगाईला राेडवर शिवाजीनगर पाेलिस ठाण्यालगत असलेल्या एका हाॅटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले हाेते. दरम्यान, कार्यक्रम आटाेलपल्यानंतर काही नातेवाईक हाॅटेलमध्ये थांबले हाेते. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत बसलेली आद्या विनीत देशपांडे (वय ११, रा. हैदराबाद) ही अचानक खाली जमिनीवर काेसळली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

घटनेची माहिती शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांना मिळल्यानंतर पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनातून जखमी मुलीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने पाठवून दिले. तेथील डाॅक्टरांनी जखमी मुलीला मृत घाेषित केले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले करत आहेत.

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यू