कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हंडरगुळी ग्रामपंचायत सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:16+5:302021-05-03T04:15:16+5:30
हाळी हंडरगुळी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बाजाराचे हे गाव असल्याने परिसरातील १५ ते २० गावांतील नागरिकांची येथे ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हंडरगुळी ग्रामपंचायत सरसावली
हाळी हंडरगुळी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बाजाराचे हे गाव असल्याने परिसरातील १५ ते २० गावांतील नागरिकांची येथे दैनंदिन रेलचेल असते. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित आढळून येत असल्याने हंडरगुळी ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. रविवारी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच गावात येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
यावेळी सरपंच विजय अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले, ग्रामविकास अधिकारी एस.आर. कांबळे, ग्रामपंचायत सदस्य नागोराव चिमनदरे, अंकुश आनलदास, सुनील कांबळे, मोहन दापके, युसुफ शेख, सतीश कांबळे, ज्ञानेश्वर पिट्टलवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक प्रशासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन गावातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यास सांगितले.
प्रत्येकाने काळजी घ्यावी...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्स राखावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरु नये. कुठलाही त्रास जाणवत असल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी, असे आवाहन उपसरपंच बालाजी भोसले यांनी केले.