शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तेरावा; लातूरमध्ये पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 20:57 IST

गळतीकडे दुर्लक्ष केल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी

लातूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एकीकडे टंचाईमुळे महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे जोडजवळा भागात संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मांजरा धरणावरून लातूरला पाणी पुरवठा केला जातो. यासाठी लातूर-कळंब रोडलगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील जोडजवळा भागात वारंवार जलवाहिनीमधून गळती होते. रविवारी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आवाज आला. यानंतर काही क्षणातच पाण्याचे फवारे उंचावर उडू लागले. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने जवळपास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथून दूरपर्यंत पाणी वाहत होते. बाजूच्या शेतात तर जणू नदीच्या पुराप्रमाणे पाणी जमा झाले आहे. रात्री आठ वाजेपर्यंतही कमी दाबाने पाणी येत होते. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीतून नेहमीच गळती होत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सध्या लातूर शहराला पाणी पुरवठा कमी होत आहे. मांजरा धरणात मृतसाठा असल्याने महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे. यावर प्रशासनाकडून नियोजनही करण्यात आले आहे. यातच जलवाहिनी फुटल्याने वाहून गेलेले लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून येत आहे. जोडजवळा नजिक फुटलेल्या जलवाहिनीमुळे शेजारच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ते तातडीने थांबविता आले नाही. जवळपास एक तास उंचावर पाण्याचे फवारे उडत होते. जलवाहिनी फुटल्याची माहिती लातूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला मिळताच तातडीने मांजरा धरणावरील पाणी उपसा करणारी मोटार बंद करण्यात आली. मात्र तब्बल एक तास पाणी वाया गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंतही जलवाहिनीतील पाणी काही प्रमाणात वाया जात होते. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने गळती दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईlaturलातूर