हॉटेलबंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST2021-04-08T04:19:49+5:302021-04-08T04:19:49+5:30
लातूर : शहर व जिल्ह्यात हाॅटेल, फॅमिली रेस्टाॅरंट आणि बिअर बार, हाॅटेलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, कोरोनाच्या ...

हॉटेलबंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !
लातूर : शहर व जिल्ह्यात हाॅटेल, फॅमिली रेस्टाॅरंट आणि बिअर बार, हाॅटेलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे या व्यवसायावर मोठी संक्रांत आली आहे. परिणामी व्यवसाय थांबल्याने हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी आणि पोळी करणाऱ्या महिलांचीच भाकर कोरोनाने हिसकावून घेतली आहे.
लातूर शहरात जवळपास ३५० च्या वर हाॅटेल्स आहेत. शहरात खवय्यै आणि शौकिन असल्याने हाॅटेल व्यवसाय तेजीत होता. शिवाय, लातूर शहर हे शैक्षणिक हब आहे. त्यामुळे या शहरामध्ये शिक्षणासाठी बाहेरगावाहून हजारो विद्यार्थी येतात. २०२० पर्यंत पुण्या-मुंबईची मुलं शहरात शिक्षणासाठी वास्तव्याला होती. त्यामुळे हाॅटेल, मेस हा व्यवसाय तेजीत होता. अचानक कोरोना आल्याने गेल्या वर्षभरापासून हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. मेस बंद झाल्या आहेत. तर काही मोठ्या हाॅटेल्समधून पार्सल सेवा सुरू आहेत. त्यात काही मोजक्या महिलांनाच भाजी-भाकरी करण्याचे काम आहे. अन्य महिलांना आता काम नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्सल सेवा सुरू असली तरी ग्राहक कमी झाला आहे. शिवाय, पुण्या-मुंबईहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या मेसही आता नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पोळी-भाजी करणाऱ्या महिलांचा रोजगार बंद झाला आहे. परिणामी, या महिलांची भाजी-भाकरीच करपून गेली आहे. वर्ष उलटून गेले, आता किती दिवस कोरोना उपाशी ठेवणार, असा प्रश्न या व्यवसायातील महिलांना पडला आहे.
उसनवारीवर काढले वर्ष; आता कसे जगायचे..!
मागील वर्षी लाॅकडाऊन झाल्यामुळे मार्च महिन्यातच लातुरात शिक्षणाला आलेली मुलं त्यांच्या गावी परतली. त्यामुळे खानावळीचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर उसनवारीवर दिवस काढले, आता पुढे कसे जगावे, असा प्रश्न आहे. मजुरीला जावे तर तेही बंद आहे, अशा भावना या भाजी-भाकरी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केल्या.
गेल्या काही महिन्यांपासून हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी करण्याचे काम मिळाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते बंद झाले आहे, असे शोभा गायकवाड म्हणाल्या. उसनवारीवर काढले वर्ष; आता कसे जगायचे..!
मागील वर्षी लाॅकडाऊन झाल्यामुळे मार्च महिन्यातच लातुरात शिक्षणाला आलेली मुलं त्यांच्या गावी परतली. त्यामुळे खानावळीचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर उसनवारीवर दिवस काढले, आता पुढे कसे जगावे, असा प्रश्न आहे. मजुरीला जावे तर तेही बंद आहे, अशा भावना या भाजी-भाकरी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केल्या.
गेल्या काही महिन्यांपासून हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी करण्याचे काम मिळाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते बंद झाले आहे, असे शोभा गायकवाड म्हणाल्या.