शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमधील घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह; आजार माणसांमध्ये पसरु शकतो, प्रशासन सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:51 IST

लातूर जिल्ह्यात एक घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळला असून चार घोडे संशयित म्हणून ओळखले गेले आहेत.

लातूर : जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य आणि माणसांमध्येही पसरणाऱ्या झूनॉटिक (मानवी संक्रमक) रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या निर्देशांनुसार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पशुसंवर्धन, आरोग्य, पोलिस, महानगरपालिका विभागांचे अधिकारी तसेच लातूर जिल्ह्यातील घोडामालक/पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात एक घोडा पॉझिटिव्ह...लातूर जिल्ह्यात एक घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळला असून चार घोडे संशयित म्हणून ओळखले गेले आहेत.ग्लँडर्स आणि फारसी कायदा १८९९, राष्ट्रीय अश्व कृती योजना २०१९ आणि प्राण्यांतील संसर्गजन्य व संक्रमक रोग अधिनियम २००९ यांच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी आदेश निर्गमित करून बाधित घोड्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने दयामरण (Euthanasia) देण्यात आले.

रोगाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनडॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लातूर यांनी या बैठकीत सादरीकरणाद्वारे ग्लँडर्स या रोगाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पाच किलोमीटर परिसरातील सर्व घोड्यांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळा व हरियाणामधील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र, हिसार येथे तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

माणसामध्ये पसरणारा आजार; दक्षता घ्या : सीईओंच्या सूचनाराहुलकुमार मीना यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्लँडर्स हा "सूचना देणे बंधनकारक (Notifiable)" व माणसांमध्ये पसरणारा (Zoonotic) आजार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन, आरोग्य, पोलिस आणि महानगरपालिका विभागांनी योग्य ती दक्षता घ्यावी..

अशी घ्या खबरदारी; सर्व विभागांना निर्देशपशुसंवर्धन विभागाने नमुने संकलन करून प्रयोगशाळेत वेळेत पाठवावेत.आरोग्य विभागाने मानवांमध्ये होणाऱ्या लक्षणांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी.महानगरपालिका व ग्रामपंचायतींनी परिसरात स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि माहिती प्रसाराचे कार्य हाती घ्यावे.पोलिस प्रशासनाने घोड्यांची वाहतूक थांबवण्यासाठी उपाय करावेत.

घोडामालक,पालक यांच्यासाठी सूचनाघोड्यांमध्ये नाकातून पू येणे, फोड, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधावा.घोड्यांचे निवासस्थानी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी.कोणतीही लक्षणे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी तत्काळ संपर्क साधावा.

जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबविली जाणारप्रशासनाने सर्व विभागांना जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत:ग्लँडर्स रोगाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दक्षता घेणे गरजेचे आहे. वेळेत निदान व प्रतिबंध हाच सर्वांत मोठा बचाव आहे.

 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य