शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औसा येथे भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कार एकाचवेळी ट्रक आणि कंटेनरला धडकली, कारमधील चौघे जागीच ठार

By राजकुमार जोंधळे | Updated: March 7, 2026 03:23 IST

शुक्रवारी रात्री १०:१५ वाजता घटना : अपघातग्रस्त कार सांगली जिल्ह्यातील...

राजकुमार जोंधळे / लातूर

औसा (जि. लातूर) : औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. भरधाव बीएमडब्ल्यू कारने ट्रक आणि कंटेनरला जोराची धडक दिली. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात एवढा भयानक होता की, महामार्गावर रक्ताचा सडा पडला आणि मानवी अवयवांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

सांगली येथील कार (एमएच ०४ ईजी ७५००) काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण केल्यानंतर सहकाऱ्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत होती. दरम्यान, औशानजीक एका हॉटेल समोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच २५ यू ०५२२) आणि एका कंटेनरला (एमएच १२ एफसी ७६४२) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, लाकडी ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली.

अपघातात मृत्यू झालेले तिघे हे औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथील रहिवासी आहेत. चालक धनराज काशिनाथ जाधव (४९, रा. सांगली), आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (३६), शुभम शेषेराव पाटील (२६), किसन रामलिंग साळुंके (४९, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात जयहिंद विश्वास जाधव (३०, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (२८, रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच औशाचे डीवायएसपी कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक रेवण डमाले, फौजदार भाऊसाहेब माळवदकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बोरगाववर पसरली शोककळा...

औसा ते तुळजापूर महामार्गावर रात्री झालेल्या भीषण विचित्र अपघातात बोरगाव येथील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने बोरगाववर शोककळा पसरली आहे. औसा पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

युवकांशी व्यावसायिक मैत्री...

सांगली येथील धनराज जाधव हे व्यापारी होते. बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने ते औसा तालुक्यासह जिल्ह्यात व्यवसायाचे जाळे निर्माण करीत होते. आज लातुरात कार खरेदी केल्यानंतर ते शिवलीकडे जेवणासाठी गेले. औसाकडे येताना हा भीषण अपघात झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific Accident in Ausa: BMW Hits Truck, Container; Four Dead

Web Summary : A horrific accident on the Ausa-Tuljapur highway claimed four lives. A speeding BMW collided with a truck and a container, killing four instantly and seriously injuring two. The deceased are from Borgaon, plunging the village into mourning. The accident occurred late Friday night.
टॅग्स :Accidentअपघात