नूतन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:38+5:302021-02-17T04:25:38+5:30
शिक्षक पतसंस्था सर्वसाधारण सभा लातूर : रेणापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २७ फेब्रुवारी ...

नूतन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव
शिक्षक पतसंस्था सर्वसाधारण सभा
लातूर : रेणापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रेणुकाई मंगल कार्यालय रेणापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिक्षक पुरस्कारप्राप्त सभासदांचा गौरव केला जाणार आहे. सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन गोपाळ पडिले, जितेंद्र शिंदे, डी.एम. राठोड आदींनी केले आहे.
सोमनाथपूर येथे जयंती साजरी
लातूर : उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राम पाटील, निवृत्ती सांगवे, विदेश पाटील, मारुती पवार, संगीता राठोड, अनुसयाबाई पवार, शिवकन्या अंधारे, संजय राठोड, रामेश्वर भाटे, अमित माडे, सचिन मोरे, वसंत वाघमारे, किसन चव्हाण, राम बनसोडे, संजय आडे, लक्ष्मण राठोड, शिवाजी राठोड, विनायक पवार, संतोष पवार, प्रेमदास पवार, पद्माकर कांबळे, श्रावण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात बससेवा सुरू करावी
लातूर : कोरोनाच्या संकटानंतर उपाययोजनांचे पालन करीत शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी तालुकास्तरावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एसटी बससेवा ग्रामीण भागात पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे. ५ वी ते ८ वी, ११ वी, १२ वी तसेच वरिष्ठ महाविद्यालयेही सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बस सुरू करण्याची मागणी आहे.
संत सेवालाल मित्रमंडळाच्या वतीने जयंती
लातूर : जळकोट तालुक्यातील संत सेवालाल मित्रमंडळाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अविनाश चव्हाण, प्रदीप राठोड, भिकाजी राठोड, प्रकाश जाधव, मारुती चव्हाण, कुमार चव्हाण, बालाजी धुळशेट्टे, सचिन भोसले, माधव वाघमारे, तानाजी राठोड, बालाजी राठोड, अमोल राठोड, भारत जाधव आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.