श्रीराम विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:01+5:302021-08-15T04:22:01+5:30
अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड होते. यावेळी गटविकास अधिकारी मोहन अभंगे, पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, संस्थेचे सचिव ...

श्रीराम विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड होते. यावेळी गटविकास अधिकारी मोहन अभंगे, पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, संस्थेचे सचिव ॲड. पंडितराव उगिले, उपाध्यक्ष माधवराव भातिकरे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरूरे, सहसचिव विठ्ठलराव कटके, संचालक ओमप्रकाश गोडभरले, अनिता भातिकरे, पंचायत समितीचे ओ. एस. पाटील, प्राचार्य बी. बी. कोल्हे, मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक सतीश गोडभरले, प्रा. पठाण यांची उपस्थिती होती.
१२ वी विज्ञान शाखेत ऋषिकेश चंदनकेरे याने ९२.३३ टक्के घेऊन प्रथम, अश्विनी चिताडे हिने ९१.५० टक्के घेऊन द्वितीय, रेश्मा शेख हिने ९१ टक्के घेऊन तृतीय आली. साईराज मालू, नम्रता मोरे यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले. कला शाखेत श्रद्धा कांबळे हिने ८९.६६ टक्के घेऊन प्रथम, निकिता शिंदे हिने ८४.३३ टक्के घेऊन द्वितीय, दीपाली घोलप हिने ८१.६६ टक्के घेऊन तृतीय आली. सुप्रिया पांचाळ, संध्याराणी टमके यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले. तसेच एनएमएमएस परीक्षेत हर्षदा जाधव, आदिती सावंत, श्रावणी कलुरे, समीक्षा अकनगिरे, समिधा सारगे, मनोज गायकवाड यांनी यश संपादन केल्याने त्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य बी. बी. कोल्हे, स्वागत गीत महादेव बन यांनी सादर केले. सूत्रसंचालन प्रा. एल. आर. शेवाळे यांनी केले. आभार सिद्धेश्वर मामडगे यांनी मानले.