निलंगा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:31+5:302021-08-21T04:24:31+5:30
कार्यक्रमास महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाराष्ट्र औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड ...

निलंगा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमास महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाराष्ट्र औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. प्रशांत गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी गुणवत्तापुर्ण शिक्षण घेऊन पुढे चांगल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात याबाबत माहिती दिली. संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. डॉ. भागवत पौळ यांनी पुढील अभ्यासक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेचे समन्वयक दिलीप धुमाळ यांनी विद्यार्थ्यांनी पुढील उपयुक्त शिक्षणाच्या संधी ओळखून शिक्षण घ्यावे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा. सुर्यकांत वाघमारे, प्रा. दत्ता गोसलवाड, प्रा. अभिजीत गोसावी, प्रा. प्रदीप घोडके, प्रा. श्रीराम पौळकर, प्रा. धनराज मंडले, प्रा. राकेश दवणे, प्रा. अमोल पाटील, प्रा. अनुप पांचाळ, गोपाळ भोपी आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण दिवे व प्रा. विश्वनाथ जाधव यांनी तर आभार प्रा. सुर्यकांत वाघमारे यांनी मानले.