लसाकमच्यावतीने गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:37+5:302021-07-28T04:20:37+5:30
येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ...

लसाकमच्यावतीने गुणवंतांचा सत्कार
येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला, यावेळी ते बाेलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गंगासागर जाभाडे होत्या. मंचावर ॲड. आर.एस.वाघमारे, दलित मित्र उत्तमराव माने, कवी तुकाराम हारगिले, शिवाजीराव जंगापल्ले, डी.जी. वरवटे, अण्णाराव सूर्यवंशी, धनराज सूर्यवंशी, बालाजी जंगापल्ले, ज्ञानोबा इप्पर, शोभाताई आकरूपे, सविता वाघमारे यांची उपस्थिती होती. यावेळी ज्ञानोबा घोसे, अनिल मकापल्ले, उदय गुंडीले, डाॅ. वैभव आकरूपे, ॲड. आशिष वाघमारे, ॲड. राहुल वाघमारे, रामनाथ पलमटे, आशिष तोगरे, सुनील डावरे, सुभाष गुंडीले, मुकुंद वाघमारे यांच्यासह दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन लसाकमचे जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर यांनी तर आभार तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अंकुश पोतवळे, विश्वंभर जिवारे, शिवाजी कांबळे, मनोज जाधव, अंबादास गायकवाड, नामदेव अर्जुने, महेश वाघमारे, इंदुमती जोगदंड आदींनी परिश्रम घेतले.