परिवहन विभागाकडून वाहनचालकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:29+5:302021-09-19T04:21:29+5:30
प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्या मार्गदर्शनात उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी लातूर शहरातील राजीव गांधी चौक, औसा ...

परिवहन विभागाकडून वाहनचालकांचा सन्मान
प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्या मार्गदर्शनात उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी लातूर शहरातील राजीव गांधी चौक, औसा राड, क्रीडा संकुलासमोर असलेल्या ऑटोरिक्षा थांब्यावर तसेच इतर ठिकाणी वाहनचालकांना थांबवून, त्यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. बसचालक, ट्रकचालकांचाही सत्कार करण्यात आला. वाहन चालवित असताना नियमांची पायमल्ली होणार नाही, मद्यपान करून वाहन चालवू नये, सुरक्षित वाहन प्रवासासाठी चालकांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, मोटार वाहन निरीक्षक मंगेश गवारे यांची उपस्थिती होती. दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस चालक दिन साजरा केला जातो. यानिमित्त वाहनचालकांना प्रेरणा देण्यासाठी पुष्प देऊन सन्मानित करण्यात आल्याचे विजय भोये यांनी सांगितले.
कॅप्शन : वाहनचालक दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने लातूर शहरातील ऑटोरिक्षाचालकांचा उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसाद नलावडे, मंगेश गवारे.