राज्याच्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:01+5:302021-03-21T04:19:01+5:30
आ. निलंगेकर म्हणाले की, राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे विविध कारनामे दररोज समोर येत आहेत. भ्रष्टाचार हा त्यातील ...

राज्याच्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा
आ. निलंगेकर म्हणाले की, राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे विविध कारनामे दररोज समोर येत आहेत. भ्रष्टाचार हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. इतर लोकांचे ठीक आहे, परंतु कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणाऱ्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारात अडकणे दुर्दैवी आहे. बदली झालेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हप्तेखोरीसारखे आरोप करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. एक जबाबदार अधिकारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोप करतो म्हणजे त्यात निश्चितपणे तथ्य असले पाहिजे. महाराष्ट्राला मोठी राजकीय व सामाजिक परंपरा आहे. त्या पत्रातील उल्लेख सत्य असेल तर या घटनेने राज्याची प्रतिमा धुळीला मिळणार आहे. अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात असणे, हे जनतेचे दुर्दैव आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी तो दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात अनिल देशमुख यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणीही आ. निलंगेकर यांनी केली आहे.