पीएसआय अमोल गुंडेंचे गृहमंत्र्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:01+5:302020-12-05T04:32:01+5:30
सूर्यकांत बाळापूरे, किल्लारी : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीसाठी विनाविलंब रक्तदान करुन त्याचे प्राण वाचविल्याने किल्लारी पोलीस ठाण्याचे ...

पीएसआय अमोल गुंडेंचे गृहमंत्र्यांकडून कौतुक
सूर्यकांत बाळापूरे,
किल्लारी : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीसाठी विनाविलंब रक्तदान करुन त्याचे प्राण वाचविल्याने किल्लारी पोलीस ठाण्याचे पीएसआय अमोल गुंडे यांचे कौतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीजवळ मंगळवारी अपघात घडला होता. त्यात दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी होता. त्याच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला ए निगेटिव्ह रक्ताची गरज होती. त्यामुळे सदरील रक्तगटाच्या रक्ताचा शोध सुरु झाला. तेव्हा किल्लारी पोलीस ठाण्याचे पीएसआय अमोल गुंडे यांचा तोच रक्तगट असल्याचे समजले.
दरम्यान, रक्तपेढीतून पीएसआय गुंडे यांना यासंदर्भात फोन आला आणि सदरील माहिती देऊन रक्तदानाची विनंती करण्यात आली. तेव्हा महत्त्वाच्या कामात असतानाही विनाविलंब पीएसआय गुंडे यांनी लातुरातील सदरील रक्तपेढी गाठून रक्तदान केले. त्यामुळे गंभीर जखमी असलेल्यास जीवदान मिळाले. त्यांच्या या तत्परतेची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेऊन त्यांचे कौतुक केलेे. तसेच किल्लारी ठाण्याचे सपोनि. म्हेत्रेवार व पोलिसांच्या वतीनेही पीएसआय गुंडे यांचा सत्कार करण्यात आला.