लातूरात शेतकरीविरोधी कायद्यांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:18+5:302021-06-06T04:15:18+5:30

लातूर : केंद्र सरकारने काेणत्याही शेतकरी संघटनांशी व राज्य सरकारशी चर्चा न करता, ५ जून रोजी तीन वटहुकूम काढले. ...

Holi of anti-farmer laws in Latur | लातूरात शेतकरीविरोधी कायद्यांची होळी

लातूरात शेतकरीविरोधी कायद्यांची होळी

लातूर : केंद्र सरकारने काेणत्याही शेतकरी संघटनांशी व राज्य सरकारशी चर्चा न करता, ५ जून रोजी तीन वटहुकूम काढले. नंतर सदरील वटहुकूम कायदा होण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेसमोर मांडले. दरम्यान, शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. त्यामुळे शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने शनिवारी लातूरमध्ये शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांची होळी करण्यात आली. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता, शेती व्यवस्था मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात तीन शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांचे दहन करुन होळी करण्यात आली. यावेळी ॲड. उदय गवारे, प्रा. दत्ता सोमवंशी, सुधाकर शिंदे, संजय मोरे, ॲड. सुशील सोमवंशी, विश्वंभर भोसले, ॲड. भालचंद्र कवठेकर, ॲड. विजय जाधव, विक्रम गिरी, कातळे, अशोक गायकवाड, डी. पी. कांबळे, सुनील मंदाडे, इलियास शेख, शैलेश सरवदे, आदींसह किसान संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Holi of anti-farmer laws in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.