पीकविम्यासाठी तहसीलसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:59+5:302021-03-13T04:35:59+5:30
मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुका ...

पीकविम्यासाठी तहसीलसमोर धरणे
मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुका सचिव मयूर पलमटे, उपाध्यक्ष विलास सांगुळे, गजानन पांगरे, गणेश शेटकर, आनंद पलमटे, शंकर गायकवाड, केशव कसले, मरिबा आचार्य, लक्ष्मण भदाडे, उत्तम कंदे, कार्तिक भिकाणे, उत्तम आचार्य, नितीन जगताप, जनार्दन फड, किशन कसले, मंचक सूर्यवंशी, अनिकेत कांबळे, प्रशांत नामपल्ले, सुनील कंदे, अनंत पलमटे, शंकर गायकवाड, मंचक पवार, रोहन कांबळे, नवनाथ सांगुळे, दीनानाथ गायकवाड, कठिराम पेड, शिवराज कासले, आप्पाराव आचार्य, दिगंबर जाधव, सूर्यकांत सूर्यवंशी, रमाकांत कोरनुरे आदी सहभागी झाले होते. आंदोलनास शिवक्रांती युवा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भुजंग उगिले, अखिल भारतीय स्वाभिमानी छावा संघटनेचे प्रदेश संघटक राजीव मोहगावकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना निकृष्ट बियाणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. ऐन काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वेळेवर पीकविमा मिळणे आवश्यक होते. परंतु, दोन महिने विलंब झाला आहे. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना व्याजासह नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तर विमा काढण्याचा अर्थ काय...
अति पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे पाहून प्रशासनाने पंचनामे केले. त्यानुसार शासनाने तोकडे अनुदान दिले. शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला असतानाही पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे प्रशासन आणि पीकविमा कंपनीत विरोधाभास दिसत आहे. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा. त्यांच्या पंचनाम्याची प्रतही त्यांना देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली.