छोटा हत्तीची दुचाकीला धडक; एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:41+5:302021-04-21T04:19:41+5:30
आंब्याच्या झाडावर पेट्रोल टाकून जाळले; गुन्हा दाखल लातूर : शिरूर आनंतपाळ तालुक्यातील बिबराळ शिवारातील गट नंबर १२९ मध्ये ...

छोटा हत्तीची दुचाकीला धडक; एक जण जखमी
आंब्याच्या झाडावर पेट्रोल टाकून जाळले; गुन्हा दाखल
लातूर : शिरूर आनंतपाळ तालुक्यातील बिबराळ शिवारातील गट नंबर १२९ मध्ये आंब्याची तीन झाडे होती. त्या झाडांवर पेट्रोल टाकून जाळून नुकसान केले, अशी फिर्याद हणमंत भाऊराव जाधव (रा. बिबराळ तालुका शिरूर आनंतपाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रल्हाद गोविंद जनमले व अन्य दोघांविरुद्ध शिरूर आनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. तपघाले करीत आहेत.
बौद्धनगर येथील घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
लातूर : शहरातील बौद्धनगर येथील घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच-२४ टी-२७७१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी घडली. याबाबत विनोद रावण सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकाॅ. मुरुळे करीत आहेत.
रिंग रोड येथील दुकानातील सव्वादोन लाखांची चोरी
लातूर : रिंग रोड परिसरातील एका दुकानाच्या बाहेर असलेल्या हवा फेकण्याच्या पंख्याची जाळी तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील दोन लाख तीस हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी १९ एप्रिल रोजी केली. याबाबत तानाजी लिंबराज जाधव (रा. एलआयसी कॉलनी, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उपनि. मोरे करीत आहेत.
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; नागरिक त्रस्त
लातूर : शहरातील कपिलनगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते उखडले आहेत. शिवाय महानगरपालिकेच्या वतीने दररोज नाल्या साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक, तसेच मनपा अधिकाऱ्यांकडे रस्ते दुरुस्तीची व नालेसफाईची मागणी केली; परंतु या मागणीकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, असे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.