चारचाकीची दुचाकीला धडक; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:21+5:302021-03-04T04:35:21+5:30
गेटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास लातूर : औसा येथील कोपरे कॉलनीमध्ये घरास बाहेरून कुलूप लावून जायफळ येथे कामानिमित्त ...

चारचाकीची दुचाकीला धडक; एक जखमी
गेटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास
लातूर : औसा येथील कोपरे कॉलनीमध्ये घरास बाहेरून कुलूप लावून जायफळ येथे कामानिमित्त गेले असता घराचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील ३४ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २० हजार रुपये असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी फिर्यादी बालाजी रावण भोंग (रा.जायफळ, ता. औसा, ह.मु. कोपरे नगर औसा) यांच्या तक्रारीवरून औसा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. बहुरे करीत आहेत.
ट्रकची दुचाकीला धडक; एक जखमी
लातूर : देगलूर ते उदगीर जाणाऱ्या रोडवर टाकळी गावाच्या पुढे दुचाकीस ट्रकने धडक दिल्याची घटना घडली. या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अशोक वामन देशमुख आपली दुचाकी क्र. एमएच २४ एएच ८२२९ ने देगलूर ते उदगीर जाणाऱ्या रोडवर टाकळी गावाच्या पुढील रस्त्यावर होते. दरम्यान, भरधाव वेगातील ट्रक क्र. एमएच २६ एडी २३३४ ने जोराची धडक दिली. या घटनेत फिर्यादी जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक क्र.एमएच २६ एडी २३३४ च्या चालकाविरुद्ध वाढवणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सोनवणे करीत आहेत.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : घरासमोर उभा असताना शेजारी राहणाऱ्या दोघांनी पाठीमागील भांडणाची कुरापत काढून संगनमत करून ब्लेडने व कत्तीने छातीवर, पोटावर मारून जखमी केल्याची घटना लातूर शहरात घडली. या प्रकरणी फिर्यादी कामीन खाजामियाँ शेख यांच्या तक्रारीवरून शेख सलाउद्दीन पाशा व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोसई. राठोड करीत आहेत.