जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक; आढळले ६०६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:31+5:302021-04-01T04:20:31+5:30
मार्च महिन्यात आढळले ७४०३ रुग्ण गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ५९११ आणि सप्टेंबर महिन्यात ९१८८ रुग्ण आढळले होते. या दोन महिन्यांमध्ये ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक; आढळले ६०६ रुग्ण
मार्च महिन्यात आढळले ७४०३ रुग्ण
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ५९११ आणि सप्टेंबर महिन्यात ९१८८ रुग्ण आढळले होते. या दोन महिन्यांमध्ये रुग्णसंख्या कमालीची वाढली होती. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. परंतु, मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मार्च महिन्यात तब्बल ७३०३ रुग्ण आढळले आहेत.
३४५ जणांची कोरोनावर मात
बुधवारी ३४५ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून त्यांना सुटी मिळाली. होम आयसोलेशनमधी २८६ तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १६, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील १, समाजकल्याण कव्हा रोड येथील २७ आणि खाजगी रुग्णालयातील ७ अशा एकूण ३४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.