जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा उच्चांक; आढळले ४४१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST2021-03-24T04:17:50+5:302021-03-24T04:17:50+5:30
होमआयसोलेशनमध्ये १७३३ रुग्ण... उपचार घेत असलेल्या एकूण बाधित रुग्णांपैकी निम्यापेक्षा अधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. १७३३ जणांवर घरीच ...

जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा उच्चांक; आढळले ४४१ रुग्ण
होमआयसोलेशनमध्ये १७३३ रुग्ण...
उपचार घेत असलेल्या एकूण बाधित रुग्णांपैकी निम्यापेक्षा अधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. १७३३ जणांवर घरीच उपचार सूरू आहेत. उर्वरित रुग्ण दवाखाना आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. मास्क अनिवार्य, फिजीकल डिस्टन्स पाळणे, वारंवार हात धुणे या बाबीकउे सर्व नागरिकांनी लक्ष केंद्रीत करुन कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीाराज बी.पी. यांनी केले आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला...
रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी ७०० दिवसांवर पाेहचला होता.मात्र, गेल्या २० दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी २५४ दिवसांवर आला आहे. ही बाब चिंताजनक आहे. रिकव्हरी रेटही थोडा कमी झाला आहे. ९५ टक्क्यांवरुन रिकव्हरी रेट ८९ टक्क्यांवर आला आहे.
पॉझिटिव्हीटी वाढल्याने चिंता वाढली...
नोव्हेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटली होती. त्या महिन्यात १ हजार ५५५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर डिसेेंबर महिन्यात १ हजार १५० रुग्ण आढळले. जानेवारी महिन्यात १ हजार १९५ आणि फेब्रुवारी महिन्यात १ हजार १७५ रुग्ण आढळले होते. सरासरी महिन्याला १२०० रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या २२ दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत असून, २२ दिवसांत ३ हजार ५५१ रुग्ण आढळले आहेत.