अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात आयोजित निरोप आणि स्वागत समारंभ सोहळ्यात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किशोर मुंडे तर प्रास्ताविक पोहेकॉ विठ्ठल बोळंगे यांनी केले. सहायक पाेलीस निरीक्षक खुब्बा चव्हाण यांची मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली. यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना निराेप देण्यात आला. तर किनगाव पोलीस ठाण्याचा पदभार सहायक पाेलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी स्वीकारला. यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शेटीबा श्रृंगारे, बालाजी गायकवाड, अफजल मोमीन, गोरख भुसाळे, असलम शेख, जाकेर कुरेशी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरीमामा सोनवणे, विष्णू मुंढे, संपतराव डोंगरे, संग्राम बरूरे, शिवाजी पाटील, लक्ष्मण सारोळे, नागनाथ माने, मनोज काडणगिरे, यलब्बा नलवाड, भाग्यश्री क्षीरसागर, राजकुमार शिंदे पाटील, गिरी, गणेश पाचांळ, एन. डी. राठोड यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप किशोर मुंढे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. बालाजी आचार्य यांनी तर सहायक पाेलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोहेकॉ. ज्ञानोबा मुरकुटे, विठ्ठल बोळंगे, व्यंकट महाके, चंदू गोखरे, महेबूब सय्यद, सुग्रीव देवळे, सिरसाठ, डोईजड, जोशी, मुंढे, हंगे, हमीद यांनी परिश्रम घेतले.
सत्कारातून पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST