पंचनाम्याचे ढोंग कशाला सरसकट मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST2021-09-26T04:22:13+5:302021-09-26T04:22:13+5:30
निलंगा तालुक्यातील गौर, शेंद, मुगाव, आनंदवाडी, निटूर शिवारातील शेती नुकसानीची पाहणी केली. समवेत निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव, रोहित पाटील, ...

पंचनाम्याचे ढोंग कशाला सरसकट मदत द्या
निलंगा तालुक्यातील गौर, शेंद, मुगाव, आनंदवाडी, निटूर शिवारातील शेती नुकसानीची पाहणी केली. समवेत निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव, रोहित पाटील, जर्नादन सोमवंशी, अशोक शिंदे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर चेवले यांच्यासह पदाधिकारी होते.
शासन निकषानुसार ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान आणि ६५ मिली मीटर पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यास पंचनामे करण्याची गरज नाही. सध्या लातूर जिल्ह्यात ५० टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झालेले असून ९५ मिली मिटरपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे आता सरकारने पंचनाम्याचे ढोंग न करता शेतकर्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केलेली आहे.
शेतकर्यांना देण्यात येणारी मदत दिवाळीपूर्वी, रब्बी पेरणीच्या अगोदर मिळणे अपेक्षित आहे. जेणेकरून शेतकर्यांचे खरीप पिकाचे नुकसान झालेले असून आता किमान रब्बीची पेरणी त्यांना करता यावी याकरीताच ही मदत तात्काळ शेतकर्यांच्या हातात पडावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी केली आहे. सरकारकडून मिळणार्या मदतीसह पिकविमा कंपनीनेसुद्धा ऑनलाईन अर्ज केलेले असो वा नसो शेतकर्यांना त्यांच्या नुकसानीपोटी विमा रक्कम द्यावी अशी मागणी यावेळी केली.