उदगीर परिसरात दीड तास जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:33+5:302021-06-03T04:15:33+5:30
उदगीर : उदगीर, किल्लारी, हाळी हंडरगुळी, हरंगुळ बु. या परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे ...

उदगीर परिसरात दीड तास जोरदार पाऊस
उदगीर : उदगीर, किल्लारी, हाळी हंडरगुळी, हरंगुळ बु. या परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
उदगीर शहर व परिसरात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड तास पाऊस झाला. तालुक्यातील लोणी, बनशेळकी, सोमनाथपूर, मलकापूरसह अन्य गावांत हंगामपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी वरुणराजाने अशाचप्रकारे हजेरी लावल्यास खरिपाच्या पेरण्या वेळेवर होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. यावेळी शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. परिसरात बुधवारी सायंकाळी पाऊस झाला. तसेच उदगीर तालुक्यातील हाळी-हंडरगुळी परिसरातही विजांच्या कडकडाटात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.