निलंगा : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोरोना काळात सेवा बजावणारे डॉक्टर्स, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
निलंगा शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात निटूर जिल्हा परिषद गटातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निटूर, पानचिंचोली येथील आशा, आरोग्यसेविका, आरोग्य कर्मचारी व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य आधिकारी श्रीनिवास कदम, प्रा. दयानंद चोपणे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मधुकर आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य कोमलताई धुमाळ, निलंगा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक पंडितराव भदरगे, संचालक दिनकर निटुरे, संचालक नरसिंग ढाकणे, औराद बाजार समितीचे संचालक गंगाधर चव्हाण, निटूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास मोरे, पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपतराव मोरे, डॉ. अश्विनी शिंदे, डॉ. प्रतिभा येळकर, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. प्रतिभा मंत्री, निटूर पोलीस चौकीचे पोलीस जमादार सत्यवान कांबळे, मुख्याध्यापक अनिल पाटील, निलंगा तालुका संगायो समितीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ, नणंदचे सरपंच हरीभाऊ बोळे, उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी उपस्थित होते.