यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर व्यवस्था करावी. व्हेंटिलेटर चालविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी व स्टाफचे आयएमएच्या मदतीने प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे. पुरेसा औषधी साठा तसेच साहित्य खरेदी करावे. बालकांना ही लाट धोकादायक असल्याचे बोलले जात असले तरी प्रौढांसाठीही तेवढीच व्यवस्था करून ठेवावी. कारण, सध्या डेल्टा प्लस हा कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या विषाणूचा आपल्या जिल्ह्यात प्रादुर्भाव अत्यंत नगण्य स्वरूपाचा रहावा, यासाठी सर्व यंत्रणेने सतर्क राहावे, असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी, उदगीर सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा तसेच ट्रॉमा केअरचे काम गतीने करण्याच्या सूचना केल्या. सामान्य रुग्णालयात ३५ बेड नव्याने निर्माण करावेत, असे निर्देश दिले. सूत्रसंचालन सहायक पुरवठा अधिकारी महेश सावंत यांनी केले. यावेळी आ. धीरज देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. किनीकर यांनी सूचना केल्या.